Rotary Club of Daund - समाज परिवर्तनाचे महायज्ञ
नमस्कार मित्रांनो! तुम्ही कधी विचार केलात का, एका छोट्याशा शहरात किती मोठा बदल घडवता येतो? मी पाहिलंय, अनुभवलंय — कारण Rotary Club of Daund सोबतचा माझा प्रवास याचा जिवंत पुरावा आहे. Rotary सोबत अनेकदा काम करताना मला जाणवलं की समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद ही आपल्यातच आहे, फक्त योग्य दिशादर्शनाची गरज असते. आणि Daund मध्ये ते दिशादर्शन Rotary ने दिलंय. त्यांच्या प्रत्येक कार्याला माझा सलाम! रोटरी च्या काही प्रमुख उपक्रमांची दखल यात घेतलेली आहे. आरोग्याचं भक्कम पाऊल स्वामी चिंचोळी परिसरात झालेलं मोफत आरोग्य तपासणी शिबिर अजूनही आठवतं. लोकांच्या चेहऱ्यावरचं समाधान, आरोग्याबद्दल जागरूकता, आणि डॉक्टर-स्वयंसेवकांची तळमळ — सगळं काही डोळ्यांसमोर उभं राहतं. त्यानंतर हनुमाननगरमध्ये Global Grant अंतर्गत 116 शौचालय ब्लॉक्स बांधून दिले गेले. ही केवळ स्वच्छतेची सोय नव्हती; हा होता सन्मान, आरोग्य, आणि सुरक्षिततेचा संदेश, जो प्रत्येक घरापर्यंत पोहोचला. युवकांसाठी नवा मार्ग Rotary च्या Interact Assembly पासून Teachers Training Workshops पर्यंत, युवकांच्या नेतृत्वगुणांचा...